---Advertisement---

घर घेवून देतो म्हणत ३६ लाखात फसवणूक

By team
On: February 24, 2024 9:21 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

‘नवीन घर घेऊन देतो’ म्हणून एकाची ३६ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सन २०१७ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरी घडली. याप्रकरणी मयूरेश शामराव पाटील (वय ४२, रा. शुक्रवार पेठ, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून नितीन नागेश मोहिरे (दक्षिण कसबा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या ओळखीचा नितीन मोहिरे याने फिर्यादी यांना गोड बोलून विश्वासात घेऊन नवीन घर घेऊन देतो असे म्हणत ३६ लाख पाटील यांच्याकडून घेतले. प्लॅट घेऊन न देता तसेच ३६ लाख परत न करता त्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम नसतानादेखील फसवणुकीच्या उद्देशाने जाणीवपूर्वक वेळोवेळी चेक देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!