---Advertisement---

कर नाही त्याला डर कशाला ; जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

By team
On: February 27, 2024 2:53 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला उपोषण मिळावे यासाठी मोठे आंदोलन सुरु असतांना नुकतेच आता दूध का दूध पानी का पानी होऊनच जाऊदे, मी देखील सर्व काही उघड करतो असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनाच्या विरोधात होणाऱ्या SIT चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस गोळी चालवत आहेत, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, ”देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत आहेत. आता दूध का दूध पानी का पानी होऊनच जाऊदे. मी देखील सर्व उघड करतो. वाटलेच तर सलाईन उचलून चौकशीला येतो. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच आणि तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार”, असे म्हणत फडणवीस यांच्याबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे जरांगे यांनी म्हंटले आहे. तसेच ”मी कुठे चुकत नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मी तुमच्या एसआयटीला घाबरत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो. मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करणार आहे. तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा”, असे जरांगे म्हणाले.

तसेच मी मराठा समाज आणि सरकारमधील काटा आहे. त्यांना सरकार आणायचे आहे म्हणून मला ते गुंतवणारच. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. माझ्याकडे कोणाचेच पैसे नाहीत. उलट तुमचेच फोन जास्त आलेले आहेत. ज्याला कर नाही त्याला डर कशाला अशी आक्रमक प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!