---Advertisement---

मराठी भाषा गौरव दिन मैंदर्गी कन्नड मुलींच्या शाळेत उत्साहात

By team
On: February 28, 2024 10:06 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

जिल्हा परिषद कन्नड मुलींची शाळा मैंदर्गी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.यावेळी मराठी भाषा विषयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. प्रारंभी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यांच्याबद्दल अनेक मुलींनी भाषण करत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांनी सुद्धा वि वा शिरवाडकर यांचे आयुष्यातील घटना क्रमवारीने सांगितले.

त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्काराबद्दल मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी मार्गदर्शन केले.मराठी भाषा दिनानिमित्त मुलींना लगोरी ,रिंग ,उडीदोरा, कॅरम, क्रिकेट सेट आदी नवीन साहित्य खरेदी करण्यात आले होते.ते साहित्य खेळण्यासाठी देण्यात आले. खेळण्याचे साहित्य शाळेतील सहशिक्षक गुरुलिंगप्पा शिवणगी यांच्या हस्ते दिले गेले.कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक कट्टीमनी आणि इतर सहशिक्षक यांनी केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया नाडगौडा यांनी केले तर आभार गीता शिवणगी यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!