---Advertisement---

जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका : तर शिंगावर घेऊ

By team
On: February 29, 2024 9:30 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देवेंद्र फडणवीस यांनी आजवर विचारांशी कधीही तडजोड केली नाही. अजित पवार यांनी सत्तेसाठी विचार आणि भूमिका बदलली. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असा इशाराही त्यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांना दिला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी अजित पवार यांनी जनतेला लिहिलेल्या पत्रावर टीकास्त्र सोडले. फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झाले. आजवर कधीही त्यांनी विचारांशी तडजोड केली नाही. अजित पवार मात्र सतत भूमिका बदल राहिले. आताही केवळ सत्तेसाठी महायुतीत सामील झाले. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असा घणाघात केला. एकीकडे अपघाताने राजकारणात आल्याचे म्हणतात, अन् ज्यांनी राजकारणात आणले त्यांच्या विषयी साधी कृतज्ञताही व्यक्त करत नाहीत ही शोकांतिका आहे, असे आव्हाड म्हणाले.

मी कोणावरही वैयक्तिक टीका-टीपण्णी केलेली नाही. आम्हाला ‘आरे’ केल्यास ‘कारे’ म्हणावे लागले. जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!