---Advertisement---

राज्यातून लोकसभेच्या ४५ प्लस जागा जिंकणार ; मुख्यमंत्री शिंदे

By team
On: March 4, 2024 9:15 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

डोंबिवली पूर्वेत सूतिकागृह व कॅन्सर व रुग्णालय, पश्चिमेतील फिश मार्केट, आयरे गाव येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमिपूजन तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र व नवजात शिशू अतिदक्षता विभाग आणि सुनीलनगर येथील अभ्यासिकेचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतिपथावर आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात पायाभूत सुविधांचे काम देशात नंबर वन आहे, तर परदेशी गुंतवणुकीत व जीडीपीतही महाराष्ट्र नंबर वनवर आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून लोकसभेच्या ४५ प्लस जागा जिंकून देण्यात व अब की बार ४०० पार करण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. डोंबिवली येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!