सोलापूर : प्रतिनिधी
हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा येथील सरवदे नगरात राहणाऱ्या एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेने रविवारी सकाळी सार्ड अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरात दोन लेकरांसह स्वतः गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. या घटनेने संपूर्ण सरवदे नगर हादरून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चिल्लाळ हे पत्नी, आई-वडील व एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह सरवदे नगर येथे राहतात, घरकुल येथे जुना विडी घरकुल एच ग्रुप येथे त्यांचे भारत विलास नावाचे चहा कॅन्टीन आहे. दररोज पहाटे ते आपल्या आई वडिलांसह हॉटेलमध्ये जातात. घरी पत्नी स्नेहा संतोष चिल्लाळ (वय ३२), मुलगी संध्या (वय ११) आणि मुलगा (वय ७) असे तिघे घरी असतात. जयळच असलेल्या एका इंग्रजी माध्यमामध्ये ती दोन्ही मुले शिक्षण घेत.
रविवारी नेहमीप्रमाणे संतोष चिल्लाळ हे कॅन्टीनला गेले होते. रविवार असल्याने त्यांनी मटणाचा बेत केला होता. त्यामुळे मटण व मासे घेऊन त्यांनी घरी पत्नीस फोन केला असता, पत्नीने फोन उचलला नाही, त्यामुळे ते मटण घेऊन तडक घरी आले असता घरचे फाटक बंद होते. त्यामुळे त्यांनी फाटकावरून उडी मारून आत खोलीत जाऊन पाहिले असता पत्नीने आपल्या दोन मुलांसह गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी टाहो फोडून आक्रोश सुरू केला. तेव्हा शेजाऱ्यांसह बघ्यांनी गर्दी केली. काही जणांनी एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या त्या तिघांचे मृतदेह शेजाऱ्यांनी खाली उतरवले होते, त्यांच्या मदतीने त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुपारच्या सुमारास मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन विभागाकडे पाठवून देण्यात आले. स्नेहा हिने टोकाचे पाऊल कशासाठी उचलले? घरची सर्व परिस्थिती बरी असताना तिने जीवन यात्रा का संपवली ? आणि हे टोकाचे पाऊल उचलत असताना तिने दोन्ही मुलांसह गळफास का घेतला? या सर्वांचा उलगडा पोलीस तपासातून आता पुढे येईल.
दर रविवारी घरात मटणाचा बेत होता, त्यामुळे आजही नवऱ्याने मटण आणले होते. फोन उचलत नसल्याने नवरा तडक घरी आला, फाटकाला कुलूप पाहून आत उडी मारून दरवाजा उघडून पाहिले असता ही हृदयद्रावक घटना दिसून आली, त्यांनी आणलेली मटणाची पिशवी तशीच फाटकाला लटकवलेली होती