---Advertisement---

पंतप्रधान मोदींनी ‘गॅरंटी’ हा शब्द चोरला

By team
On: March 7, 2024 9:29 AM
Follow Us:
---Advertisement---

नंदुबार : वृत्तसंस्था

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खासदार राहुल गांधी यांनी वापरलेला ‘गॅरंटी’ हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे केला. केंद्र व राज्य सरकारने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. किती वर्षे गांधी परिवाराच्या नावाने खडे फोडणार, असा प्रश्नही पटोले यांनी नंदुरबारात पत्रकारांशी बोलताना केला.

राहुल गांधी यांची न्याय यात्रा नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात येणार असून, जाहीर सभा देखील होणार आहे. यानिमित्त आढावा घेण्यासाठी बुधवारी नाना पटोले नंदुरबारात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विकास न करता भाजप १० वर्षांपासून फक्त काँग्रेसवर टीका करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर टीका करतात; मग गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा देशाच्या क्रिकेट संघटनेचा प्रमुख कसा बनतो, याला काय म्हणावे, असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!