---Advertisement---

तीन दिवसात होणार आघाडीतील जागा वाटप ; प्रदेशाध्यक्ष पाटील

By team
On: March 9, 2024 9:53 AM
Follow Us:
---Advertisement---

लातूर : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने नुकतेच भाजप पाठोपाठ कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले आहे. तर अद्याप राज्यातील महाविकास आघाडीमधील पक्षांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. अद्याप अंतिम यादी तयार झाली नसली तरी आगामी तीन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, लोकसभेतील जागांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र काही जागांचा प्रश्न चर्चेअंती सुटणार आहे. जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्यात असून कोणाचीही नाराजी होणार नाही, अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे. कोणता फॉर्म्युला नाही, पण तीन दिवसांमध्ये कोणत्या जागेवर कुणाचा उमेदवार हे स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!