बीड : वृत्तसंस्था
कॉंग्रेसने नुकतेच लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली आहे तर भाजप देखील येत्या काही दिवसात यादी जाहीर करणार आहे तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी आता निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे.
पंकजा मुंडे म्हणाले कि, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, मी पुढे तुमची काळजी घेते, असे सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. आगामी काळात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिले असल्याची चर्चा आता रंगली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होत आहेत. या निवडणुकीत काळजी घेण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. पंकजा मुंडे या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील, अशी शक्यता गेल्या काही दिवसापासून वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
मी सध्या माजी आमदार तसेच माजी ग्रामविकास मंत्री आहे. त्यामुळे मला तुम्हाला काही देता येत नाही. मात्र, इथे बसलेले अनेक नेते हे आजी आहेत. या आजी नेत्यांना माजी लोकांनीच आजी केले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मात्र, ज्यांनी तुम्हाला आजी केले त्यांना विसरू नका, लोकसभा निवडणुकीत मदत करा, पुढे मी तुम्हाला मदत करेल, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील शिरूर येथे सिद्धेश्वर देवस्थान संस्थानमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी उमेदवारीची संकेत दिले आहेत.