---Advertisement---

मनसेचा राहुल गांधींना इशारा : अपशब्द वापरले तर याद राखा

By team
On: March 13, 2024 3:06 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी दोन दिवसापासून राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी राहुल गांधी अनेक योजना देखील जाहीर करीत आहेत. मात्र मनसे आक्रमक दिसत आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात यावे, मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर त्यांना महाराष्ट्रातील जनता राज्यात फिरू देणार नाही, असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी या आधी देखील सावरकारांचा अपमान केला होता. आता ते महाराष्ट्रात आले आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेमुळे पुन्हा एकदा या विषयावर राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. सावरकरांचे घर हे शिवाजी पार्क मैदानाच्या जवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहात, तुमचे म्हणणे मांडा त्याला आमची ना नाही. मात्र, इथे येऊन जर तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमान जनक किंवा दुसरे वक्तव्य केले, तर महाराष्ट्राची 14 कोटी जनता राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. या कोल्ह्यांबरोबर सामील झालेले लांडगे यांनी देखील हे लक्षात ठेवावे, की त्यांचीही महाराष्ट्रात खैर नाही. अशा कडक शब्दात संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्र दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप हा मुंबईमध्ये होणार आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी तसेच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेवरुन राज्यातील राजकारणात बरीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता मनसेच्या वतीने राहुल गांधी यांना हा इशारा देण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले तर राहुल गांधी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनसेने राहुल गांधी यांना दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!