---Advertisement---

…तेव्हा फडणवीसांनी पक्ष वाचवून दाखवावा ; खा.संजय राऊत

By team
On: March 18, 2024 1:50 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून भाजप व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लोहा लोहे को कांटता है, हे आम्हालाही माहीत आहे. ज्या दिवशी आमच्या हातात केंद्रात ईडी आणि सीबीआय येईल, त्यादिवशी भाजप शिल्लक राहिलेला नसेल असा रोखठोक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला आणि पक्षाला वाचवून दाखवावे असे आव्हानही राऊतांनी दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, ”ज्या दिवशी आमच्या हातात केंद्रात ईडी आणि सीबीआय येईल, त्यादिवशी देवेंद्र फडणवीसांना हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावे. त्या दिवशी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नसेल. लोहा लोहे को कांटता है, हे आम्हालाही माहीत आहे. ते फक्त त्यांनाच माहीत आहे, असे नाही. ज्या दिवशी आमच्याकडे केंद्रातील सत्तेसोबत ईडी आणि सीबीआय येईल, त्यादिवशी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला आणि पक्षाला वाचवून दाखवावे”, असे राऊत म्हणाले.

पुढे परिवारवादाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर टीका करताना राऊत म्हणाले की, ”हे बीन परिवाराचे आहेत का? यांना पोरं बाळ झाले नाहीत का? की त्यांनी दुसऱ्यांची पोरं पळवली. भाजप हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाहीत. त्यामुळे ते फोडलेल्या आमच्या पक्षातील पोरं घेऊन बसलेले आहेत. स्वतःच्या पोरांचे पाळणे त्यांनी हलवावे. दुसऱ्यांच्या पोरांच्या पाळणे हलवू नये आणि ती दुसऱ्यांची पोरंही एक दिवस पळून जातील”, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!