---Advertisement---

भीषण अग्नितांडव : जीव मुठीत घेऊन आलेल्या पर्यटकांची पळापळ

By team
On: March 18, 2024 1:56 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेले खडवली येथील भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांना दि.१७ रोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडल्याचं दिसलं आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या परिसरात असलेल्या गावकऱ्यांनी नदीचं पाणी मारून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार वारा वाहत असल्यामुळं आग वेगात पसरत होती.

अखेर काही लोकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर त्यांना या आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या घटनेमुळे या परिसरातील हॉटेल, ढाबाचालक सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करत नसल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. खडवलीत भातसा नदी किनारी असलेल्या हॉटेल आणि ढाब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भातसा नदीच्या किनाऱ्यावर भीषण अग्नीतांडव पाहायला मिळालं आहे. यामुळे उपस्थित नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!