---Advertisement---

शिंगाड्याची शेव खाल्याने १० जणांना विषबाधा

By team
On: March 22, 2024 9:19 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

शिंगाड्याच्या पिठाची शेव खाल्ल्याने तीन महिलांसह सात पुरुष अशा एकूण १० जणांना गुरुवारी विषबाधा झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मिहानमधील एका प्रतिष्ठित फार्मा कंपनीत काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांनी कंपनीमधीलच कॅन्टीनमधील शिंगाड्याच्या पिठाची शेव खाल्ली. त्यानंतर तीन ते चार तास होताच सर्वांनाच मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही थंडी वाजून थरथर कापायला लागले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. विषबाधा झालेल्या दहापैकी तीन महिलांची प्रकृती खालावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!