ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोबाइलवर गेम खेळणे बेतले जीवावर : चार भावंडाचा दुर्देवी मृत्यू

मेरठ : वृत्तसंस्था

चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट झाला अन् घराला आग लागून चार भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेरठच्या जनता कॉलनी परिसरात घडली. या घटनेत आई-वडील गंभीर जखमी झाले. होळीच्या पूर्वसंध्येला हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनता कॉलनीतील जॉनी यांची मुले पलंगावर बसून चार्जिंग लावलेल्या मोबाइलवर गेम खेळत होती त्याचवेळी एकाएकी मोबाइल व चार्जरच्या जोडणीत शॉर्ट सर्किट होऊन त्याचा स्फोट झाला. त्याच्या ठिणग्या पडल्याने गादीने पेट घेतला. त्यात जॉनी, त्यांची पत्नी बबिता व चार मुले सारिका (१०), निहारिका (८), संस्कार ऊर्फ गोलू (६) आणि कल्लू (४) गंभीररीत्या भाजले. उपचारादरम्यान रात्री निहारिका व गोलू यांचा, तर, रविवारी सकाळी सारिका आणि कालू यांचा मृत्यू झाला. जॉनीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तथापि, बबिता या गंभीर असल्याने त्यांना दिल्लीला हलविण्यात आले.

घटनेवेळी मोठी मुलगी सारिका आई बबितासोबत पलंगाजवळ बसलेली होती. आगीने उग्ररूप धारण केल्याने मुले पलंगावर अडकली, जॉनीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात मुलांसोबत हे तिघेही भाजले, असे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!