---Advertisement---

सोलापुरात पहिली कारवाई : सराईत महिला गुन्हेगार तडीपार

By team
On: March 27, 2024 9:40 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुका व आगामी काळात विविध जाती धर्माचे सण, उत्सव मिरवणुकांच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. शहरात कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्याच्या उद्देशाने सराईत महिला गुन्हेगार शमा इब्राहिम शेख (वय-४३, रा.प्लॉट नंबर ३८, राजीव नगर, शांती नगरजवळ, सोलापूर) हिस दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे कि, सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे व सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराईत महिला गुन्हेगार शमा इब्राहिम शेख हिच्यामुळे परिसरातील मुली, महिलांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. ती येथील रहिवासी व व्यावसायिक यांना हानी पोहोचवत होती. त्यामुळे लोकांमध्ये तिच्याविषयी भीती निर्माण झालेली आहे.

सराईत महिला गुन्हेगार शमा शेख हिच्याविरुध्द गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते. २५ मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे.
शमा शेख हिस हगलूर (ता. आळंद, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) येथे सोडण्यात आले आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या नेतृत्वाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वपोनि दादा गायकवाड, सपोनि संगीता पाटील, स्वप्नील गायकवाड, पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी ही कामगिरी बजाविली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!