ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदारकीचा राजीनामा : निलेश लंके ‘तुतारी’ चिन्हावर लोकसभा लढविणार

अहमदगर : वृत्तसंस्था

अहमदनगरमधील पारनेरमध्ये निलेश लंके यांनी समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. भाषणादरम्यान निलेश लंके म्हणाले की, “आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.” निलेश लंके यांना भाषणादरम्यान रडू कोसळलं.

आताच ईमेलद्वारे राजीनामा पाठवत आहे, असं सांगत निलेश लंकेंनी राजीनाम्याचं पत्र भर सभेत उपस्थितांना दाखवलं. शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण पुढे जायचं आहे. मधल्या काळात पवार साहेबांना आपण दु:ख दिलं, ते भरून काढायचं, असंही लंके म्हणाले. दरम्यान निलेश लंके यांनी मोठी घोषणा करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. अहमदगर येथे जाहीर सभेत लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेला सोडचिठ्ठी दिली. ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला आहे. लंके हे आता तुतारी चिन्हावर दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदार संघातून उभे राहणार आहेत. त्यांच्या पुढे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे आव्हान असेल.

दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी काल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असं निलेश लंके म्हणाले. यावेळी निलेश लंके यांनी राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं निलेश लंके यांनी जाहीर केलं.

आता शिवधनुष्य हाती घेतलं आहे. मी अजित पवारांची माफी मागतो. आता मला माफ करा. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आता आपल्याला कायदेशीर अडकायचं नाही. आता आपण अभिमन्यू आहोत. आपण चक्रवादळात अडकलो आहोत. तुम्ही मला पाच वर्षांसाठी निवडून दिलं. मात्र आता साडेचार वर्षे झाली आहेत. मला पाच वर्षांसाठी निवडून दिलं आहे. मात्र मी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आता आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल. चार महिने कमी असताना आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी म्हणालो माझ्या लोकांना विचारू द्या”, असं निलेश लंके कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

“आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागेल”, असं निलेश लंके म्हणाले आणि त्यांच्या भावनांचा बांध फुटला. ते प्रचंड भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरलं. “आपल्याला लढायचे आहे. रडायचं नाही. या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आपल्याला आता विधानसभा पदाचा राजीनामा द्यावा लागेल. आपण आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पाठवत आहोत”, असं निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

निलेश लंके यांनी यावेळी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपल्याला लोकसभा निवडणूक लढायची आहे, असं निलेश लंके म्हणाले. यावेळी निलेश लंके यांनी अधिकृतपणे शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचा फोटो आपल्या हातात घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी निलेश लंके यांनी अजित पवार यांच्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. “अनेक लोकांनी सांगितले आम्ही तुमच्यासोबत, तर अनेक जेष्ठ लोक मला येऊन भेटले. तालुक्याचे राजकारण कसंही असू द्या. मात्र आम्ही तुमच्या बाजूने, असं म्हणाले. मी आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. नंतर कोविड आला. अनेक जण मला म्हणाले होते तुम्ही गुहाटीला गेले का? आम्ही अजित दादांसोबत गेलो. छातीवर दगड ठेऊन निर्णय घेतला. मी आमदार असू नाहीतर नसो. मात्र अजित पवार राजकारणात राहिले पाहिजेत”, अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!