---Advertisement---

हँडल सोडून स्टंट बेतले : दुचाकीवरील तिघे ठार

By team
On: March 30, 2024 11:37 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

धुळवडीच्या दिवशी भेंडे ले-आउटजवळ झालेल्या अपघाताचे कारण समोर आले आहे. ट्रिपलसीट भरधाव दुचाकी चालवत असताना चालकाने हात सोडून स्टंटबाजी सुरू केली. यातून दुचाकी दुभाजकाला धडकली व त्यात तीनही मित्रांचा जीव गेला. राणा प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सविस्तर वृत्त असे कि, प्रकाश भैयालाल राऊत (वय २५), निकेश ज्ञानेश्वर अतकरे (२७)उमेश रामेश्वर शेंडे (२५) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही जयताळा बाजाराकडून खामला बाजाराच्या दिशेने निघाले होते. भेंडे ले-आऊट चौक पार करत असतानाच प्रकाशने गाडीवरील हात सोडले आणि दुसरीकडे मागे बसलेला उमेश हा हातवारे व अंगविक्षेप करत होता. दरम्यान, दुचाकी दुभाजकाला धडकली व २२ फूट घासत गेली व ढोमणे सभागृहाजवळील विजेच्या खांबाला धडकली. सीसीटीव्हीमुळे अपघाताचे कारण समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!