---Advertisement---

कोणाला पाडायचे त्याला पाडा ; जरांगे पाटील

By team
On: March 31, 2024 9:21 AM
Follow Us:
---Advertisement---

जालना : वृत्तसंस्था

वडीगोद्री वेळ कमी पडल्याने अपेक्षित अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देऊन मी समाजाला चिखलात ढकलू शकत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठिंबा देणार नाही. आपण विधानसभेची तयारी सुरू करू, मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासह मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील, त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

मनोज जरांगे-पाटील यांनी गावागावांतून आलेल्या अहवालांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी अंतरवाली सराटी येथे बैठक घेतली. दिवसभरात आलेल्या अहवालांचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार काढला. आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करू, असे जरांगे म्हणाले.

आरक्षणासाठी महिलांवर लाठीहल्ला झाला. हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले. शेकडो युवकांचे बळी गेले. त्यामुळे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढवायची, असे मत समाजाचे होते. त्यासाठी गावागावांत जाऊन समाजाच्या मतांचा अहवाल आणा, असे सांगितले होते. हा अहवाल अपुरा आहे. राजकारणापुढे आरक्षणाचा प्रश्न मागे पडत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!