---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून औद्योगिक विकास करण्यास देणार सर्वोच्च प्राधान्य

By team
On: April 1, 2024 9:07 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा औद्योगिक विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असा मानस सोलापूर लोकसभेचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केला.

सोलापूर लोकसभेचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ भाजयुमो सोलापूर शहर व माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नागेश भोगडे आयोजित “कॉफी विथ युथ” हा युवक संवाद मेळावा बाळीवेस येथे युवकांच्या गर्दीत मोठ्या उत्साहात पार पडला.

“कॉफी विथ युथ” कार्यक्रमास माजी राज्यमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, कसबा ट्रस्टी अध्यक्ष पै. सोमनाथ भोगडे, सोमनाथ घुंगे, आयोजक माजी नगरसेवक नागेश भोगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी भोगडे परिवारातर्फे उमेदवार राम सातपुते यांना मानाचा फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच युवकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे उमेदवार राम सातपुते यांनी आपल्या मनोगतातून दिली. माजी केंद्रीय मंत्र्यांच्या लेकीने मी ऊसतोड कामगार म्हणून कितीही शिव्या दिल्या तरी मी सोलापूरच्या विकासावरच बोलणार आहे. सोलापूर शहराचा औद्योगिक विकास केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे आमदार सातपुते यांनी सांगताच गर्दीने जमलेल्या युवकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिला. रवी कोठमाळे यांनी सूत्रसंचालन तर प्रेम भोगडे यांनी आभार प्रदर्शन केले. युवक संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!