---Advertisement---

तुम्ही मातृशक्तीला संपवू शकणार नाही – फडणवीस

By team
On: April 5, 2024 10:51 AM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती : वृत्तसंस्था

हिंदू समाजातील शक्तींना संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांनो लक्षात ठेवा, आमची शक्ती आमची मातृशक्ती आहे. त्यामुळे तुम्हीच संपणार, परंतु आम्हाला तुम्ही संपवू शकणार नाही, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर गुरुवारी अमरावती येथील सभेतून केली.

महायुतीच्या उमेदवाराने गुरुवारी नामांकन अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र वैध ठरवत न्याय व्यवस्थेने त्यांना न्याय दिला आहे. त्यामुळे पोपटासारख्या बोलणाऱ्यांना ही चपराक आहे. भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांचाही चांगलाच समाचार घेतला.

देशात हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना पहिल्यांदाच १४ दिवसांची जेल होत असेल तर आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करायचे काय ? एका महिलेचा अनादर करणाऱ्या विरोधकांनी हिंदू समाजातील शक्तींना म्हणजेच आमच्या महिला शक्तींना संपवण्याचा विचार केला आहे. परंतु राहुल गांधी, उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवा तुम्ही संपणार, परंतु आम्हाला संपवू शकणार नाही, असा इशारादेखील फडणवीस यांनी दिला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!