---Advertisement---

सोलापूरचा तापमानाचा पारा पुन्हा वाढला

By team
On: April 6, 2024 9:51 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान ४३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये चार अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे रस्त्यावर भयान शांतता पसरली आहे.

या एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४१ ते ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. आता पारा ४३ अंशाच्या पुढे गेला असून हा — आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. सोलापूर सह मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येते. पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीस या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!