---Advertisement---

हातात कोयता घेवून व्हिडिओ ; पोलिसांनी केली अटक

By team
On: April 6, 2024 10:28 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत मारत राहावे, मेलं तर मारत राहावे. एक घाव दोन तुकडे.. केली तर दुश्मनी कट्टर करा.. अशी धमकी देत सोशल मीडियावर (व्हॉट्स अॅप ग्रुप) हातातील कोयता दाखवणाऱ्या इसमा विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, विशेष म्हणजे कारवाईनंतर त्याने पोलिसांची हात जोडून माफी मागितली. विजय राजकुमार माने (वय ३४, रा. विडी घरकुल सध्या अयोध्या नगरी सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याने एका व्हॉट्स अॅप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ तयार करून पोस्ट केला होता व्हिडिओमध्ये त्याने हातात कोयता घेतला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाली.

पोलिसांनी शोध घेतला असता तो अयोध्या नगरीत राहात असल्याचे कळाले. पोलिसांनी घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता व घरातील अन्य एक कोयता असे दोन कोयते जप्त केले व त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार वाजिद पटेल, पोलीस नाईक योगेश बरडे यांनी ही कामगिरी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!