रमजान सणातून मुस्लिम बांधवांकडून सर्वधर्मसमभावाचे दर्शन
शेरीकर मित्रपरिवार तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
रमजान सणातून नेहमी मुस्लिम बांधवांकडून सर्वधर्मसमभावाचे दर्शन होते. त्यामुळे समाजात ऐक्य देखील टिकून राहते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.अक्कलकोट, येथे रमजान सणानिमित्त माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर मित्रपरिवारातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.आरीफ शेरीकर चौक, मक्का मस्जिद अक्कलकोट येथे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.सर्व धर्मसमभावाचे दर्शन या इफ्तार पार्टीमध्ये दिसले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या इफ्तार पार्टीमध्ये अक्कलकोट शहर व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत सद्दाम शेरीकर यांनी केले.या कार्यक्रमास ऍड.सुरेश सूर्यवंशी चेतन नरोटे,अशपाक बळोरगी, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले,हजरत मस्तुर शाह कादरी, अविनाश मडिखांबे,रईस टिनवाला, रजाक सय्यद,शाकीर पटेल, वसंत देडे,अकील बागवान,रुद्र स्वामी,मुबारक कोरबु,फारूक बबर्ची,सोएल फरास आदिंसह मान्यवर पदाधिकारी व एस.एस सोशल ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व मुस्लीम बांधव उपस्थित होते.सद्दाम शेरीकर व एस एस सोशल ग्रुप मित्रपरिवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.