---Advertisement---

भाजपा शिक्षक आघाडी सहसंयोजकपदी संजय टोंपे !

By team
On: April 7, 2024 10:58 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

भाजपा शिक्षक आघाडी सोलापूर शहर सहसंयोजकपदी संजय टोंपे यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र आमदार राम सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार आहे.पुढच्या वेळी हेच सरकार येणार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप शहरातील प्रभागांमध्ये अधिक सक्षम करणार असल्याचे टोंपे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

सोलापूर शहर भाजपा शिक्षक आघाडीची नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली.यात सोलापूर लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध विषयावर चर्चा झाली.सोलापूर शहरातील उत्तर,मध्य व दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध पद नियुक्त्या देण्यात आल्या.या कार्यक्रमास भाजप शिक्षक आघाडी प्रदेश मुख्य संयोजक डॉ.प्रशम कोल्हे, पश्चिम महाराष्ट्र संयोजक डॉ. नारायण राजूरवार, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, नारायण बनसोडे, पांडुरंग दीड्डी,भाजप शहर शिक्षक आघाडी संयोजक दत्तात्रय पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष राम वाकसे आदिंसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!