---Advertisement---

मित्रांना चिकन वाढत नसल्याने पत्नीच्या पोटात खुपसला चाकू

By team
On: April 12, 2024 9:25 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

जेवायला घरी आणलेल्या मित्रांना आणखी चिकन का वाढत नाही म्हणून पत्नीच्या मांडीवर काठीने लोखंडी नळीने मारहाण करून जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू पोटात खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील देगाव येथे घडली. दि.१० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत यशोदा चक्रधर काळे (वय ६५, रा. देगाव) या वृद्धेने फिर्याद दिली असून चक्रधर जुगरास काळे याच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यशोदा या सिविल हॉस्पिटल ट्रॉमा केअर येथे अॅडमिट असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहते घरी देगाव (ता. मोहोळ) येथे फिर्यादी यशोदा यांचे पती चक्रधर जुगरास काळे याने त्याचेसाठी व त्याचे मित्रासाठी जेवनासाठी चिकन आणले. चिकन व भाकरी करुन ताटे वाढून दिली असता माझ्या मित्रांना आणखीन चिकन का वाढत नाही, असे म्हणून काठीने लोखंडी नळीने मांडीवर, पोटऱ्यावर मारुन शिवीगाळ करुन रागाच्या भरात पत्नीस जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू पोटात खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून पत्नीने चक्रधर जुगरास काळे याच्या विरूद्ध फिर्याद दिली आहे. याबाबत तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!