---Advertisement---

पंतप्रधान मोदींना लोक घाबरायला लागले ; संजय राऊत

By team
On: April 13, 2024 4:34 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

संजय राऊत यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर मधील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा शोले चित्रपटातील गब्बर प्रमाणे असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मोदीचा चेहरा एवढा भयंकर आहे की, लोक त्यांना घाबरायला लागले आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा चेहरा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, आता मोदींचा चेहरा एवढा भयानक झाला आहे की, लोक त्यांना घाबरू लागले आहेत. मोदी कधी टीव्हीवर येतील आणि काहीही घोषणा करतील अशी भीती लोकांना वाटत आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भयानक कामे केली असून त्यांचा चेहरा आता लोकांना नकोसा झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ऑलम्पिक मध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा लागली तर नरेंद्र मोदी यांना गोल्ड मॅडल मिळेल. ते फेकू चॅम्पियन असून राष्ट्रीय स्तरावर फडणवीस तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अंपायर म्हणून अमित शहा यांचे नाव घ्यावे लागेल. ते नंबर एकचे खोटारडे पंतप्रधान असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!