---Advertisement---

अपयशी गृहमंत्री, राज्यात गुन्हेगारी वाढली ; सुळे यांचा हल्लाबोल

By team
On: April 15, 2024 9:34 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना त्या म्हणाल्या की, भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिले, त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येथे आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण आमच्याकडून होण्यासाठी वाटेल ते करू. सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार प्रकरण धक्कादायक आहे. भर रस्त्यावर असे होत असेल, तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भर रस्त्यावर अशा प्रकारे गोळीबार होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे अबकी बार गोळीबार सरकार या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!