---Advertisement---

सांगोल्यातील महिलेचा उष्माघाताने मृत्यू

By team
On: April 18, 2024 9:55 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगोला : प्रतिनिधी

भर दुपारी शेतात काम करीत असलेल्या ६५ वर्षीय महिलेस चक्कर आल्याने बेशुद्ध पडून मृत्यू झाला. ही घटना १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एखतपूर (ता. सांगोला) येथे घडली असून हिराबाई प्रल्हाद घारगे (वय ६२) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, खबर देणार सचिन तुळशिराम घारगे यांचे एखतपूर येथील घराचे शेजारीच चुलते चुलती व त्याची मुले हे ही एकत्र राहण्यास आहेत. बुधवार दि. १७ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास चुलती हिराबाई घारगे या शेतात काम करीत असताना अचानक चक्कर येऊन पडल्या. हा प्रकार सचिन घागरे यांच्या पत्नीच्या निदर्शनास येताच त्यांनी सचिन घारगे यांना फोनद्वारे सांगितला. यावर सचिन घागरे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता हिराबाई या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दिसल्या. यावर त्यांनी इतरांचे मदतीने तातडीने खासगी रूग्णवाहिका बोलावून सांगोला येथील रुग्णालयात आणले. यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्या असल्याचे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!