---Advertisement---

…म्हणून फडणवीसांचे पंख छाटून उपमुख्यमंत्री केले ; संजय राऊत !

By team
On: April 21, 2024 3:43 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

पंतप्रधान होण्याचे फडणवीसांचे स्वप्न होते. मात्र मोदी शहांनी त्यांचे पंख छाटून त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच हेच मोदी- शहा यांचे राजकारण म्हणावे लागेल असेही ते म्हणाले. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल हे मोठे विधान केले आहे.

संजय राऊत म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांनी जे सांगितले ते 100% सत्य आहे. त्यावेळी फडणवीस आणि आमचे चांगले संबंध होते. चर्चा झाली त्यावेळी ते म्हणाले होते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईल. मी दिल्लीत अर्थमंत्री, पंतप्रधान होईल. इतके मोठे स्वप्न फडणवीस यांचे होते”, असा दावा राऊतांनी केला आहे.

पुढे राऊत म्हणाले, ”महाराष्ट्राच्या नेत्याला इतकी मोठी संधी संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहू. मात्र मोदी शहा यांनाच फडणवीसांचे हे मोठे स्वप्न आवडले नाही. त्यांनी फडणवीसांचे पंख छाटले आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केले. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली त्यांना ठेवले”, अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे देखील देशाचे नेतृत्व करू शकतात असे राऊत म्हणाले. ”उद्धव ठाकरे राजचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते देखील देशाचे नेतृत्व करू शकतात. राहुल गांधी यांना देशाचे नेतुरत्व करण्याची संधी मिळाली तर आमची त्याचे स्वागत करू. आघडीत काँग्रेस मोठा पक्ष आहे. मात्र इतर पक्षांचे नेतेही आहेत. त्यामुळे नेतृत्व कोण असेल यापेक्षा हुकूमशाही संपवणे हा मोठा प्रश्न आहे. भाजपमध्ये तर दहा वर्षांपासून एकच चेहरा आहे”, असे राऊत म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!