---Advertisement---

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदान जनजागृतीची शपथ

By team
On: May 2, 2024 10:12 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन, नको जात पात, हवा आहे विकास, आयटी हब झालाच पाहिजे, अशी घोषणा देत कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ घेतली.महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच केंद्रात बहुमताचे सरकार प्रस्थापित व्हावे म्हणून मतदान हे एक पवित्र कर्तव्य आहे, माझ्या एका मतामुळे केंद्रात मजबूत सरकार येणार आहे. म्हणून आम्ही मतदान करणार आहोत. नको जात पात- हवा आहे विकास असे म्हणत विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेतली.

संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, एनएसएस चे कार्यक्रमाधिकारी प्रा. राजशेखर पवार, डॉ शितल भस्मे, प्रा विद्याश्री वाले, प्रा विपुल जाधव, प्रा शितल फुटाणे, प्रा गुरुशांत हपाळे, डॉ बाळासाहेब पाटील उपस्थित होते. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोकळगी, रुपाली शहा,मल्लिकार्जुन मसुती यांनी कौतुक केले.

गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे
अक्कलकोट परिसरात औद्योगिकीकरणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत, कारखानदारी विकसित होण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सोई उपलब्ध आहेत, आता दळणवळणाची चांगली सोय आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येथे कारखाने उभारले पाहिजे. गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे,असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!