---Advertisement---

अक्कलकोटमध्ये उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा

By team
On: May 4, 2024 5:48 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या ( रविवारी) महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अक्कलकोटमध्ये जाहीर सभा घेणार आहेत,अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी दिली आहे.

बस स्थानकाजवळील मल्लिकार्जुन मंदिराच्या पाठीमागील प्रांगणामध्ये दुपारी १ वाजता जाहीर सभा होणार आहे.या सभेला भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व पक्षाचे प्रमुख नेतेमंडळी, घटक पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभास्थळी ८ ते १० हजारांवर लोक बसतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे,अशी माहिती माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.‌ अनेक दिवसानंतर गडकरी हे प्रचारासाठी अक्कलकोटमध्ये येताना दिसत आहेत. त्यामुळे गडकरी काय बोलणार याकडे अक्कलकोटवासियांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!