---Advertisement---

…म्हणून आम्ही भाजपला घालविणार ; शरद पवार

By team
On: May 12, 2024 9:51 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, याचा पुनरुच्चार करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उडवली. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शनिवारी शरद पवार यांची हडपसर येथे सांगता सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

देश हुकूमशाहीच्या रस्त्याने चालला आहे. या देशात ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, त्यांनाही सत्तेतून घालवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खोट्या केस टाकून तुरुंगात डांबले जात आहे. दहा वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा मोदी व्यक्तिगत हल्ले करत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख नाही, अशा गोष्टी ते मांडतात. भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील असे सांगतात, सांगण्यासारखे काही नसल्याने असत्य प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांची ते टिंगलटवाळी करतात; मात्र गांधी कुटुंबाने देशासाठी योगदान दिले असून त्याच्या एक टक्का तरी मोदी यांनी योगदान दिले का, याचे उत्तर द्यावे, असेही शरद पवार म्हणाले

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!