ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : जरांगे पाटलांचे पुन्हा ‘या’ दिवसापासून उपोषण !

मुंबई : वृत्तसंस्था

देशात गेल्या महिन्यापासून लोकसभा निवडणूक सुरु आहे. तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करीत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 4 जून पासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी नारायण गडावर सभा होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ते सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील करत असल्याचे सांगितले जात आहे. या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळेच मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या चार-पाच लोकांमुळे आली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही नाही. मात्र, जोपर्यंत सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर तसा निर्णय झाला नाही तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही राजकारणात पडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!