---Advertisement---

सावधान : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी

By team
On: May 14, 2024 10:48 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट सुरु झाले असून यात आता मुंबई, पुणे, ठाणे, पालघरवर आजही अवकाळीचे संकट कायम आहे. राज्यात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्वमोसमी पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम आहे. तर उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.

आज राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे शहरात देखील आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या पुणे शहरासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या तीन दिवसापासून संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

मुंबईत पुढील दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी 50-60 किमी/तास वेगाने वाऱ्याचा वेग येऊ शकतो. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!