---Advertisement---

चारचाकी व बसचा अपघात : माय लेकासह लेकीचा मृत्यू

By team
On: May 14, 2024 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरा जवळील गंगाधरी जवळ घडली आहे. हा अपघात एसटी बस आणि अल्टो कारची धडक दिली असून या मध्ये अल्टो कार मधील आई वंदना संतोष नलावडे (४०), मुलगा शुभम संतोष नलावडे ( २३) राहणार शिंदे पळाशे, तर मुलगी कल्याणी मनोज शिंदे (२२) राहणार महाड सांगवी या अपघातात जागीच ठार झाले. तर तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी बालकास पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दि. १४ रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान मनमाड डेपोची एसटी बस क्र. MH १४ BT ४४ ९८ चाळीसगाव कडून नांदगावच्या दिशेने तर अल्टो कार क्र. MH १५ CD २०५७ चाळीसगावच्या दिशेने जात असताना गंगाधरी जवळील विठाई पेट्रोल पंपा समोर या बस गाडीचे आणि कारची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चक्काचूर झाला.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बडे, पोलीस हवालदार राजू मोरे, शेख, करत आहे. अपघाताची माहिती नांदगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली, आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार सुहास कांदे यांना देखील घटनेची माहिती मिळताच आमदार कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि अपघात ग्रस्तांसाठी तत्काळ मदत कार्य सुरू केले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!