---Advertisement---

… हा पंगा तुम्हाला महागात पडणार ; संजय राऊत

By team
On: May 18, 2024 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

तोडायची, महाराष्ट्र खत्म करायचा हेच भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहे. पण मोदीजी आप तो गयो ! तुम्ही महाराष्ट्राशी पंगा घेतलाय. हा पंगा तुम्हाला ४ जूनला महागात पडणार आहे. तुम्हाला झोला घेऊन हिमालयात पाठवायची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी बीकेसी येथे आयोजित परिवर्तन सभेत केली.

उत्तर प्रदेशनंतर सर्वात मोठे राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी यंदाच्या निवडणुकीत ४० जागा जिंकणार असल्याचा दावाही
त्यांनी केला आहे. इंडिया महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत राऊत यांनी ही टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत भाजपने गेल्या १० वर्षांत देशात, महाराष्ट्रात केवळ विष पेरण्याचे काम केले, असा आरोप केला. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात उत्तम चाललेले सरकार पाडण्याचे काम भाजपने करत फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ही नकली मिंदे सेना आणि अजित पवार हे महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले पाप आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत करायला निघालेले नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचार हाच आपला मंत्र केला आहे. विकासाच्या नावाखाली फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण भाजपने करत दुसऱ्याची पोरं मांडीवर घेतली एवढाच विकास केला आहे, असे पुढे राऊत टीका करताना म्हणाले. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करत तयार केलेल्या संविधानाला खत्म करण्याचा डाव येत्या ४ जून रोजी महाराष्ट्रातील जनता उधळून लावणार आहे. यामुळे निकालानंतर मोटा भाई, छोटा भाई कोणी सत्तेत राहणार नसल्याचा दावाही राऊत यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!