---Advertisement---

अभिनेत्री रवीना टंडन दारूत चिंग ; महिलेला केली मारहाण

By team
On: June 2, 2024 3:54 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री रवीना टंडनने मद्यधुंद अवस्थेत असतांना एका वयस्क महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आलीय. रवीनाच्या ड्रायव्हरने रात्री बांद्रा येथील रिझवी कॉलेजच्या परिसरात गाडी चालवली. त्यावेळी एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर रवीनाचा ड्रायव्हर गाडीबाहेर आला आणि त्याने वृद्ध महिला आणि त्यांच्या कुटुंबासोबत वादविवाद केले.

हा सर्व प्रकार चालू असताना रवीना टंडन गाडीबाहेर आली. ती काहीशी मद्यधुंद अवस्थेत होती. याच अवस्थेत तिने वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. वृद्ध महिला ७० वर्षांची आहे. या प्रकारामुळे इतर लोकांनी रवीनाला चांगलंच घेरलं. याशिवाय अनेक जणं ही घटना मोबाईलमध्ये कैद करत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल की, रवीना लोकांना “मला धक्का मारु नका, मोबाईलमध्ये शूट करु नका”, अशी विनंंती करताना दिसतेय.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!