मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनता नेहमीप्रमाणे यंदा देखील मान्सूनची आतुरतेने वाट आहे. मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनचे आमगन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे. मान्सून राज्यात दाखल झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड आनंद झाला आहे. राज्यातील इतर ठिकाणी मान्सून कधी पोहचेल याची सर्वजण वाट पाहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अखेर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागप्रमुख डॉ.के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करत ही आनंदाची माहिती दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे तळ कोकणात आगमन झालं आहे. पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे. सध्या पाऊस कोकणातील रत्नागिरी, पुढे सोलापूर त्यानंतर बंगालच्या खाडीपासून ते इस्लामपूरपर्यंत पोहचणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
डॉ. होसाळीकर यांनी सांगितले की, ‘काल गोव्यातील मडगावपर्यंत आलेला मान्सून आज राज्यामध्ये दाखल झाला. आज राज्यातील कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे. मान्सून दक्षिण महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग पार करत मान्सून रत्नागिरी, त्यानंतर सोलापूर त्यानंतर मेढक आणि बाजूच्या राज्यांपर्यंत जाणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोकणात आणि दक्षिण कोकणातील काही भागांसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील चांगला पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.’
राज्यासह देशामध्ये मान्सूनची नेमकी काय परिस्थिती असणार आहे याबद्दल सांगताना डॉ. होसाळीकर यांनी सांगितले की,’संपूर्ण हंगामाच्या पूर्व अनुमानानुसार देशामध्ये चांगला म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. जूनमध्ये मध्य भारतामध्ये त्यामध्ये महाराष्ट्र राज्य देखील येते. याठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळातील मान्सूनबद्दलची सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी देत राहू.’