---Advertisement---

ग्राहकांना बसला फटका : बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

By team
On: June 6, 2024 2:12 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी भाववाढ होत असतांना नुकतेच बुधवारी सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताच भारतीय वायदे बाजारातही सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. आज 6 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 770 रुपयांनी वाढला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ नोंदवली आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही सातत्याने चढ-उतार होत आहे.

आज 6 जून रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 6,730 रुपये प्रति ग्रॅम तर, 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम 7,342 इतके आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 67,300 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅमचा भाव 73,420 रुपये इतका आहे.

जळगाव शहरातील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार आजचे सोन्याचे दर 72,820 रुपये आहे. म्हणजेच आज सोन्याचे दर 350 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर 91,670 रुपये असून 960 रुपयांनी चांदीच्या दरात देखील वाढ झालेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!