ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…स्वतः नाव घेऊन विधानसभेत उमेदवार पाडणार ; जरांगे पाटलांचे उपोषण सुरू

मुंबई : वृत्तसंस्था

आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र तरीही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. मी उपोषण करणारच असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी सगेसोयरेची अधिसूचना करण्याची मागणी केली आहे.

यावेळी ”आता मराठा आरक्षण दिले नाही तर विधानसभेत मी स्वतः नाव घेऊन उमेदवार पाडणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. शिवाय मराठा आरक्षण न दिल्यास 288 जागांवर उमेदवार उभे करणार. यामध्ये सर्व जाती धर्माच्या उमेदवारांचा समावेश असेल. मग यासाठी जबाबदार सरकार असेल. त्यानंतर सरकारला बोलायला जागा राहणार नाही”, असेही ते म्हणाले.

यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे, ते म्हणाले, ”मराठा समाजाने शांत राहायचे आहे. सरकारकडून सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली पाहिजे. जातीय तेढ या शब्दांत आता द्वेष दिसायला लागला आहे. ग्रामस्थांकडून देण्यात आलेले निवेदन हे जाणीवपूर्वक होते. मात्र मला राजकारणात पडायचे नाही. मी आचारसंहितेचा सन्मान केला म्हणून 4 जूनच्या उपोषण 8 जूनपर्यंत पुढे ढकलले. आता विनाकारण समाजाला वेठीस करण्याचे कारण नाही”, असे जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!