---Advertisement---

अजित पवार भावूक : शरद पवारांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

By team
On: June 11, 2024 9:33 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

शिव-शाहू-फुले आणि आंबेडकरांचे विचार हा आमच्या पक्षाचा आत्मा आहे. काहीही झाले तरी हा विचार आम्ही कधीच सोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिली. २४ वर्षे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांनीही पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज माझ्या वतीने आणि पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, असे म्हणताना अजित पवारांचा कंठ दाटून आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभेत अपयश मिळाले असले तरी खचून जाण्याचे कारण नाही. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचे आहे. परत एकदा संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. येत्या ऑगस्टपर्यंत राज्यसभेत पक्षाचे तीन सदस्य झालेले असतील, असेही अजित पवार म्हणाले.

पक्षाच्या आमदारांबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक जण तर असे बोलतो की जणू काही आमचा आमदार रोज त्याच्याशी फोनवरून बोलत असतो, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता टीका केली. मात्र असे काहीही नाही. विरोधक जाणीवपूर्वक बातम्या पेरत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!