ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फडणवीस असणार महायुतीचे बॉस ; भाजपचा निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फायदा झाला नसल्याची जबाबदारी घेत भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता पण हायकमांडने त्यांना या निर्णयावर नकार दिल्याने पुन्हा एकदा देवेद्र फडणवीस हेच भाजपचे दिग्गज नेते असल्याचा प्रत्यय आला आहे. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील ते महायुतीचे बॉस असणार आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नाही.

राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता, ही जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता. यावर आज चर्चा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. दरम्यान, या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप आणि विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा लवकर करणार केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछेहाटीबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत झाली. तर विधानसभेसाठी केंद्राकडून फूल सपोर्ट मिळणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी बैठक पार पडली. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला, त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत कुठे आणि कशी मतं मिळाली, कुठे चांगले यश मिळालं, कुठे कमी मतं मिळाली? त्याची कारण काय काय होती? निवडणुकीत कोण कोणत्या मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या बैठकीत झाली. त्यासोबत येत्या विधानसभेचा रोडमॅपवर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!