---Advertisement---

अक्कलकोट ते किणी रस्त्यावर बसच्या धडकेत तरुण ठार, एक जखमी

By team
On: June 24, 2024 9:38 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक शहरात अपघाताचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच अक्कलकोट ते किणी रोडवरील पालापूर मोड वळणावर रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एसटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात जेऊर येथील तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीवर पाठीमागे बसलेला एक तरुण जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश नरसप्पा कलशेट्टी (वय २७ रा हंगरगा ता.तुळजापूर जि धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे तर विजयकुमार बब्रुवान साबळे (रा. हंगरगा ता. तुळजापूर जि. धाराशिव) हा जखमी झाला. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात एसटी चालक महांतेश बसण्णा फुलारी (रा. जेऊर ता. अक्कलकोट) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मृत कलशेट्टी व साबळे हे दोघे दुचाकीवरुन एम एच १४ एफ एल ९८९८ निघाले असताना समोरुन आलेल्या एसटीने एम एच ०६ एस ८१६८ जोराची धडक दिल्याने अविनाश कलशेट्टीचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!