ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संसदेत दाखल होताच खा.शिंदे भावूक : संविधान धोक्यात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

यंदाच्या लोकसभा निवडणुकी राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश आले असून यात गेल्या दोन टर्म भाजपचा खासदार असलेल्या सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदेंनीही विजय मिळवत पहिल्यांदाच संसदेत जाण्याचा मान मिळवला. सोमवारी त्या नवीन संसद भवनात दाखल झाल्या.

संसदेत पोहचल्यानंतर प्रणिती शिंदे भावूक झाल्या. नवीन संसद भवनात पहिल्यांदाच खासदार शपथ घेणार आहे. मीडियाशी बोलताना प्रणिती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संसदेच्या पायऱ्या चढतानाचा क्षण खूप भावनिक होता, असं त्या म्हणाल्या. पण त्याचवेळी त्यांना जुन्या संसद भवनाचीही आठवण झाली. जुने संसद भवन असायला हवे होते. ते खूप ऐतिहासिक होते, असे त्यांनी सांगितले. लोकशाहीच्या मंदीरात हे माझे पहिले पाऊल होते, त्यामुळे खूप भावनिक झाले. देशसेवा करत असल्याचा गर्व वाटला. लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रात तीन टर्म आमदार होते. खासदारकीची पहिलीच टर्म आहे. सध्या खूप आव्हाने आहेत. युवक, महागाई, बेरोजगारी, नीट यांसह संविधान धोक्यात आहे. हे मोठे आव्हान आहे. सत्यमेव जयते, असे म्हणत प्रणिती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, संसदेत दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व इंडिया आघाडीतील अनेक खासदारांनी आवारात आंदोलन केले. हातात संविधानाच्या प्रती घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे यांच्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या इतर खासदारांनाही या आंदोलनात सहभाग घेतला होता.

खासदारकीची शपथ
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर देशभरातील खासदार संसदेत दाखल झाले आहेत. 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात या खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिली जात आहे. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस शपथ दिली जाणार आहे. तर 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!