---Advertisement---

तर हमाम मे सब नंगे है, ; राणेंनी उडविली राऊतांची खिल्ली

By team
On: June 25, 2024 2:33 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत भाजपकडून कंगना रनौत विजयी झाल्या असून त्यांनी नुकतेच महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं. त्या निघून गेल्या. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत. तुमच्या सारख्या बँकडोअरने आलेल्या नाहीत, असा टोला भाजप आमदार नीतेश राणे यांनी राऊतांना लगावला आहे. तर हमाम मे सब नंगे है, उगाच बडबड करू नका असेही त्यांनी म्हटले आहे.

नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर तिकडे किती दिवस राहायचा? त्याच उत्तर कधी देणार,असा सवाल भाजप आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला आहे. गजनी झालेल्या राऊतला माहित नाही, अडीच वर्ष मविआची सत्ता होती. तुमचे मालक मुख्यमंत्री होते, तेव्हा ड्रग्स का थांबले नाहीत?. तुम्ही काय प्रयत्न केले? तुमचे गृहमंत्री जेलमध्ये होते.

नीतेश राणे म्हणाले की, उडता मातोश्री बाबत चिंता करा. तुझ्या मालकाचा मुलगा ड्रग्सवाल्या लोकांसोबत का असतो? रिझवी कॉलेजच्या मागे कोण भेटायचे? हे तुमच्या मालकाच्या मुलाला विचारा, त्यांची थेर थांबवा.अमली पदार्थाचे धागेदोरे मातोश्री वरून मिळतील. कुंपण शेत खात आहे हे तुम्हाला कळेल अन् त्यानंतर ते कधीच ड्रग्जबद्दल बोलणार नाही, असे राणेंनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!