---Advertisement---

भरधाव कारची ट्रकला जबर धडक ; दोन ठार तर तीन जखमी

By team
On: June 26, 2024 3:21 PM
Follow Us:
---Advertisement---

केज : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्याजवळ आज दि.२६ पहाटे ४.३० च्या सुमारास कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर तिघे जण जखमी झाले. ही घटना घडली. अपघातातील मृत आंध्रप्रदेशातील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे बीड कडून अंबाजोगाईकडे येणारा ट्रक (एम एच-४४/ए बी-८७८६) कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्या वेळी ट्रक चालक हे त्यांच्या ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने (ए पी-३९/एस एस-५६५७) उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. यात कारमध्ये बसलेले आंध्रप्रदेशातील अनोळखी एक स्त्री व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती संकुता, (रा. गुडीवाडा, आंध्रप्रदेश) आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमी झाले. तसेच ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखाँ पठाण (रा. पाटोदा, जि. बीड) हे जखमी झाले आहेत.

हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. तर ट्रकचा मागील डाव्या बाजूचा टायर फुटला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. दोन मृत व एक जखमी यांची ओळख पटलेली नाही. तर दोघांची ओळख पटली आहे. पोलिसांनी आंध्र प्रदेशातील मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मृत व जखमी परराज्यातील असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत आहे. त्यांना तेलगू भाषे व्यतिरिक्त इतर भाषा समजत नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, पोलीस नाईक राजू गुंजाळ, शेख रशीद घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींना मदत केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!