ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री सत्तारांचे मोठ वक्तव्य : दहा दिवसात ब्रेकिंग न्यूज मिळणार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असतांना नुकतेच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठा वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले कि, मनोज जरांगे पाटील हे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात. जरांगे यांच्या मागण्याचा महाराष्ट्र सरकार गंभीर विचार करत आहे. येत्या 10 दिवसात या विषयावर तोडगा निघून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
मनोज जरांगे यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याचं मी स्वागत केलं आहे. पण काही चिल्लर लोक खडखड करत आहे. मी आजही आपल्या शब्दावर ठाम असून, मनोज जरांगे यांनी केलेल्या निर्णयाचे स्वागतच करतो असे जरांगे पाटील म्हणाले. कुणात दम असेल तर या समोर या असंही सत्तार म्हणाले. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण द्यावे, अशी मी माझी मागणी होती. ओबीसीवर अन्याय करा असे मी काही म्हटलो नाही असंही जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहे. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात असेही जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत. निजाम सरकार असताना देखील मुस्लिमांना जेवढा निधी मिळाला नाही. तेवढा आमच्या सरकारमध्ये मिळाला असेही सत्तार म्हणाले.

मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली आहे, त्याला न्याय मिळेल. प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असतो. आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करत असल्याचे सत्तार म्हणाले. मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी दोनदा बोललो आहे. देशभरात अनेक मतदारसंघात मुस्लिमांचा विरोधात मतदान झालं आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये मला जे काही बोलायचं आहे, ते मी बोलत असतो असेही सत्तार म्हणाले. मुस्लिमांची एकी पाहायचे असेल तर लोकांनी निवडणुकीत लाईन लावून मतदान केलं. माझ्या सारखे दोन चार टक्के नसेल गेले, पण एखाद्या दिवशी मी देखील त्या लाईनमध्ये जाईल असेही सत्तार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!