मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेतील पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले असून त्यात पंकजा मुंडे यांच्या देखील नावाच्या समावेश आहे. या मुळे पंकजा मुंडे यांचे अखेर पुनर्वसन झाले असल्याची चर्चा होत आहे. पंकजा मुंडे यांच्या सोबतच सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांच्या नावाचा देखील यात समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये सर्वात आधी पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळात विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
एकूण एकूण 11 जागांसाठी होणाऱ्या या विधान परिषदेत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वाटेला पाच जागांचा येणार आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. या आधी देखील पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेवर करण्यात आली होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना संधी डावलण्यात आली. लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे उमेदवारी देण्यात आली आहे.