---Advertisement---

कपलिंग तुटल्यानंतर इंजिन झाले वेगळे ; वाचा कुठे घडली घटना

By team
On: July 6, 2024 5:03 PM
Follow Us:
---Advertisement---

इगतपुरी : वृत्तसंस्था

राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईकडे जाणाऱ्या मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी काही अंतरावर पुढे निघुन गेल्याची घटना कसारा जवळ घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडहुन मुंबईच्या दिशेने जाणारी पंचवटी एक्सप्रेसने शनिवार दि. ६ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कसारा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर अचानक कपलिंग तुटली. यामुळे इंजिन व एक बोगी मुंबईच्या दिशेने निघुन गेली तर बाकी पंचवटी एक्सप्रेसच्या बोग्या मागे राहिल्या. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने इंचिन थांबवून पुन्हा इंजिन मागे आणून बाकी बोग्यांना जोडण्यात आले. यानंतर ही एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र या प्रकारामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुक खोळबंली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!