ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का : ठाकरे गटात नेता करणार प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसंकल्प मेळाव्यातून आज ते विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत.

माजी उपमहापौर राजू शिंदे हे आज आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शहरातील कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली असून क्रेनच्या सहाय्याने मोठा हा तयार करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात खोचक बॅनरबाजी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दिलेला शब्द पाळणार का उद्धवजी, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे.

राजू शिंदेला मी आधीच म्हणत होतो पक्षात ये. येतो येतो म्हंटला. लोकसभेत आला असता तर मी जिंकलो नसतो का? भुमरेंना दिली तशी लीड मला दिली असती असे म्हणत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे. संभाजीनगरसाठी ठाकरेंच्या काळात अडीच हजार देण्यात आले होते. पाणीपुरवठा योजना गद्दारांचे सरकार करायला तयार नाही. गॅसची पाईपलाईन नेमकी कुठं अडकली? नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघात तयार करणार आहे. आम्ही ताकदीने लढत आहोत. विधानसभेचे रणशिंग आपण संभाजीनगरातून फुंकत आहोत, अशी गर्जना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

राजू शिंदेंना लोकसभेआधी पक्षात यायला सांगितले होते, त्यांच्यामुळे माझा पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या निर्णय आम्ही सहन करुण घेऊ,राजू शिंदेंनी उद्धव् ठाकरेंसह शिवसेनेवर टीका केली होती, पण माणूस बदलतो, असे म्हणत चंद्रकांत खैरेंनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. दरम्यान चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, विधानसभेचे तिकीट हे अजून ठरलेले नाही, अर्ज दाखल करण्याच्या दिवशीपर्यंत उमेदवार कोण हे अनेकदा जाहीर होत नाही, असे म्हणत राजू शिंदे पश्चिमचे उमेदवार नाही असे सूचक वक्तव्य केले आहे. तर बाहेरुन आलेल्या माणसाला पक्षात सामावून घेणे अवघड जाते असेही खैरेंनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!